राज्यपालांच्या हस्ते सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन

वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापिठामार्फत सिंधू स्वाध्याय केंद्र या संस्थेतर्फे सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्र चालविण्यात येणार आहेत. याचे भूमिपूजन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज वेंगुर्ला येथे करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

      हे अभ्यास केंद्र वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहाच्या समोरील शासनाच्या जागेत हे केंद्र विकसित होणार आहे. या अभ्यासकेंद्रात सागरी जीवनशास्त्र व मत्स्योद्योगसागरीशास्त्रसामाजिक व आर्थिक अभ्यास केंद्रनौकानयन व मासेमारीकिनारपट्टी तसेच जीवनशास्त्रीय भुशास्त्रखनिज-तेल- वायू सागरी तंत्रज्ञानसागरी कायदा व सुव्यवस्थाकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन असे ८ प्रकारचे अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत.

      भूमीपूजन समारंभाप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकरजिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीप्रभारी कुलगुरू डॉ.रविद्र कुलकर्णीप्रांताधिकारी प्रशांत पानवेकरमुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगेगटविकास अधिकारी विद्याधर सुतारविद्यापीठ अभियंता विनोद पाटीलसिंधुदुर्ग उपपरिसर संचालक श्रीपाद वेलिगप्रभारी कुलसचिव डॉ.विनोद पाटीलउपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंकेमाजी नगरसेविका कृतिका कुबलशीतल आंगाचेकरकृपा गिरप- मोंडकरपूनम जाधवखर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu