प्रधानमंत्री सुरक्षा विम्याचे २ लाख जमा

तुळस-पांडेपरबवाडी येथील महेश वसंत साटम यांचे ९ जून २०२१ रोजी अपघाती निधन झाले होते. कै.साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा उतरविला होता. यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारस म्हणून त्यांची पत्नी ममता साटम यांना विम्याची २ लाख रुपये रक्कम यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते ममता साटम यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी होडावडा शाखा व्यवस्थापक सुनिल जाधव व बँक कर्मचारी आर्ची कांबळी, राघवी डिचोलकर, प्रितम ठाकूर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu