‘गणित मुलभूत कौशल्ये‘ पुस्तकाचे प्रकाशन

गणित विषयाचे प्रसिद्ध तज्ज्ञ शिक्षक व आसोली हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांनी लिहिलेल्या गणित मुलभूत कौशल्ये‘ या गणित विषयक पुस्तकाचे प्रकाशन १९ ऑक्टोबर रोजी आसोली हायस्कूल येथे झाले. यावेळी व्यासपिठावर माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकरउद्योजक पुष्कराज कोलेआसोली ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष विष्णू उदय धुरीमुख्याध्यापक विष्णू रेडकरशिक्षिका भावना आवळेमाजी शिक्षक सुरेश शिरोडकरमाजी मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकरसुरेश धुरीविजय धुरीझिलू घाडीवर्षा किनळेकररेश्मा पिगुळकरएकनाथ पिगुळकर आदी उपस्थित होते.

      या पुस्तकात सुमारे ३७ स्वाध्याय असून गृहपाठ म्हणून विद्यार्थ्यांना सोडवायला तसेच आठवीपर्यंत शिकणा-या विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास म्हणून वापरता येणार आहेत. संख्यावरील मुलभूत क्रिया बेरीजवजाबाकीगुणाकार व भागाकार अपूर्णांकदशमान अपूर्णांक क्रियांचा क्रमघातांकअसमानतामसावि-लसाविबैजिक राशीदैनंदिन जीवनातील निगडीत घटक आणि महत्त्वपूर्ण उपयुक्त गणितातील उच्चस्तरीय गणिती पाया या पुस्तकात अंतर्भूत केला आहे.

Leave a Reply

Close Menu