वेंगुर्ला ते पंढरपूर पायी वारीचे प्रस्थान

वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे निघणा-या पायी वारीचे प्रस्थान बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी झाले. वेंगुर्ला बाजारपेठेतून निघालेली ही पायी वारी पहिल्या दिवशी दुपारी बिपिन वरसकर यांच्या घरी तर रात्रौ मठ येथील सुरेश नाईक यांच्या घरी मुक्कामास राहिली.

      या पायी वारीत बहुसंख्य महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले आहेत. हरिनामाचा गजर करीत प्रस्थान केलेल्या या वारीचे मार्गात ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत होत आहे. दि.२७ रोजी सकाळी कै.चंदुशेठ आसोलकर बाग कामळेवीररात्री बबन नाईककोलगाव यांच्या घरी मुक्काम झाल्यानंतर दि. २८ रोजी सकाळी साटम महाराज आश्रमरात्री आंबोली२९ रोजी दुपारी आजरा व रात्री निपाणी३० रोजी दुपारी नरसिहवाडीरात्री मिरज३१ रोजी दुपारी नागजरात्री सांगोला१ नोव्हेंबर रोजी दुपारी मठ वस्ती व रात्री पंढरपूर येथे पोहचणार आहेत. दि.२ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत या वारीचा पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे.

Leave a Reply

Close Menu