१ हजार १११ पणत्यांनी उजळले मंदिर

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध मारुती स्टॉप नजिकच्या मारुती मंदिरात २६ ऑक्टोबर रोजी प्रज्वलित केलेल्या १ हजार १११ पणत्यांनी मंदिर उजळून गेले.

      श्री हनुमान सेवा मंदिर न्यासातर्फे दीपावलीचे औचित्य साधून दरवर्षी १ हजार १११ पणत्या प्रज्वलित करण्यात येतात. यावर्षी हा कार्यक्रम २६ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यासाठी विठु माऊलीआकारात पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu