उन्हाळी सत्र-२०२२ बी.एच.एम.एस.एस.चा निकाल जाहीर

        महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठनाशिक मार्फत घेतलेल्या उन्हाळी सत्र-२०२२ बीएचएमएसएस या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात  कोकण एज्युकेशन सोसायटीच्या (अलिबाग) लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल वेंगुर्ला या महाविद्यालयाचा प्रथम वर्ष बीएचएमएसएसचा २०१५चा निकाल ६६.६६ टक्केद्वितीय वर्ष बीएचएमएसएसचा २०१५चा निकाल २१.४२ तर तृतीय बीएचएमएसएसचा नविन अभ्यासक्रमाचा निकाल ५० टक्के लागला. तसेच तृतीय वर्ष बीएचएमएसएसचा २०१५ अभ्यासक्रमाचा निकाल ८४.८४ टक्केचतुर्थ वर्ष बीएचएमएसएसचा नविन अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के तर चतुर्थ वर्ष बीएचएमएसएसचा २०१५ अभ्यासक्रमाचा निकाल ८१.२५ टक्के लागला.

      प्रथम वर्ष बीएचएमएसएसचा २०१५ अभ्यासक्रमाला बसलेले १२ पैकी ८ विद्यार्थी उत्तीर्णी होऊन निकाल ६६.६६ टक्के लागला. यातील अॅनाटॉमीचा ८३.३३ टक्केफिजोओलॉजीचा ६६.६६ टक्के तर फॉर्मसीचा ८३.३३ टक्के निकाल लागला. द्वितीय वर्ष बीएचएमएसएसचा २०१५ अभ्यासक्रमाला बसलेले १४ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण निकाल २१.४२ टक्के लागला. यातील पॅथोलॉजीचा १६.६६ टक्केएफ.एम.टी.चा ४२.८५ टक्केएच.एम.एम.चा ३३.३३ टक्के तर ऑरगॅनॉनचा ७१.४२ टक्के निकाल लागला. तृतीय वर्ष बीएचएमएसएसचा नविन अभ्यासक्रमाला बसलेले २ पैकी १ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ५० टक्के लागला. यातील गायक्नोकोलॉजीचा ५० टक्केएचएमएमचा १०० टक्के तर ऑरगॅनॉनचा ५० टक्के निकाल लागला. तृतीय वर्ष बीएचएमएसएसचा २०१५ अभ्यासक्रमाला बसलेल्या ३३ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८४.८४ टक्के लागला. यात शितल आनंदा पवार (६६.७५ टक्के) हिने प्रथम आणि ऋतुजा राजेश खैरे (६६.५८ टक्के) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.

      तृतीय वर्ष बीएचएमएसएसचा नविन अभ्यासक्रमातील सर्जरीचा निकाल ९३.७५ टक्के लागला असून शितल आनंदा पवार (७१ टक्के) हिने प्रथमगायक्नोकोलॉजीचा ९०.६२ टक्के यात प्रियांका अनिल जगताप (७० टक्के) हिने प्रथमएच.एम.एमचा ९३.७५ टक्के यात शितल आनंदा पवार (६९ टक्के) हिने प्रथमऑरगॅनॉनचा ९६.७७ टक्के यात आर्या बाळकृष्ण माने (६९ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

      चतुर्थ वर्ष बीएचएमएसएसचा नविन अभ्यासक्रमाला बसलेले तिनही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यातील मेडिसीनएच.एम.एम.ऑरगॅनॉनरिपर्टरी व कम्युनिटी मेडिसीनचा निकाल १०० टक्के लागला. एच.एम.एममध्ये झिनत फारुख ठाकूर (६९.७५ टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

      चतुर्थ वर्ष बीएचएमएसएस २०१५ अभ्यासक्रमाला बसलेले १६ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८१.२५ टक्के लागला. यात किर्ती शरद मोरजकर (६६.७३ टक्के) हिने प्रथम तर प्राची रामचंद्र पाटील (६५.९३ टक्के) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.

      चतुर्थ वर्ष बीएचएमएसएस २०१५ अभ्यासक्रमातील मेडिसीनचा निकाल ९२.३० टक्के यात प्राची रामचंद्र पाटील (५२.६० टक्के)-प्रथमएच.एम.एम.चा १०० टक्के यात किर्ती शरद मोरजकर (६६.२५ टक्के)-प्रथमऑरगॅनॉनचा १०० टक्के यात तेजश्री विश्वनाथ चव्हाण (७१ टक्के)-प्रथमरिपटर्रीचा ९२.३० टक्के यात किर्ती शरद मोरजकर (७२ टक्के)-प्रथमकम्युनिटी मेडिसीनचा ८७.५० टक्के निकाल लागला असून यात किर्ती शरद मोरजकर (७४ टक्के) हिने प्रथम क्रमांक मिळविला.

      या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.के.जी.केळकरउपप्राचार्य डॉ.पूजा कर्पेडॉ.मनोज आरोसकरडॉ.मिलिड बोर्डवेकरडॉ.स्नेहल गोवेकरडॉ.शेखर सामंतडॉ.गिरीश बोर्डवेकरडॉ.सोनाली सावंतडॉ.परेश बोवलेकरडॉ.व्ही.जी.तोरसकरडॉ.अनिल वणकुद्रेडॉ.सिद्ध सावंतडॉ.एस.टी.सावंतडॉ.संजिव लिगवतडॉ.नयनेश गावडेडॉ.पी.व्ही.वडगावेडॉ.दिपाली देसाईडॉ.रश्मी कार्लेकरडॉ.रविद्र बुरुडडॉ.प्रिया मराठेडॉ.श्रीराम हिर्लेकरडॉ.कुंभारडॉ.संगीता मुळेडॉ.अनघा बोर्डवेकरडॉ.राजेश्वर उबाळेडॉ.संदिप पाटीलडॉ.रुपाली माळीडॉ.एस.सी.सावंतडॉ.सतिश पाटीलडॉ.मोहन जगतापडॉ.प्रल्हादा मणचेकरडॉ.राखी माधवडॉ.प्रशांत सामंतडॉ.दर्शना कळंगुटकरडॉ.समता धुरीडॉ.मंदार नाबर यांचे मार्गदर्शन लाभले.

      यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष संजय पाटीलसचिव सिद्धार्थ पाटीलमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक खोपकरस्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मनमोहन दाभोलकरशिवाजीराव कुबलसुलोचना तांडेलप्राचार्य डॉ.के.जी.केळकरउपप्राचार्य डॉ.पूजा कर्पे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu