वांद्रेश्वर व धोकमेश्वर मंडळाचे नरकासूर प्रथम

सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल व कुबलवाडा आणि  माणिकचौक मित्रमंडळवेंगुर्ला यांच्यावतीने २३ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला शाळा नं.१च्या पटांगणावर संपन्न झालेल्या भव्य नरकासुर स्पर्धेत मोठ्या गटात वांद्रेश्वर मित्रमंडळाच्या नरकासुरास तर लहान गटात धोकमेश्वर सातेरी मित्रमंडळ पाटीलवाडा यांच्या नरकासुरांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

      या नरकासुर स्पर्धेत मोठ्या गटांत १० तर लहान गटात १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या नरकासुर स्पर्धेत मोठा गटात द्वितीय- गिरपवाडा मित्रमंडळतृतीय- यंगस्टार मित्रमंडळ केरवाडा तर उत्तेजनार्थ-झकास मित्रमंडळ यांनी तर लहान गटात द्वितीय- महाजनवाडी मित्रमंडळतृतीय-आनंदवाडी मित्रमंडळ व उत्तेजनार्थ-गाडीअड्डा  मित्रमंडळ यांनी पटकाविले. या स्पर्धेतील मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रु. ७०००/- रु. ५०००/- रु. ३०००/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु. १०००/- तर लहान गटातील प्रथम तीन क्रमांकास विजेत्यास रु. ३०००/-रु. २०००/-रु. १०००/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु.५०० या स्वरूपात ठेवण्यात आलेल्या बक्षिसांचे सामाजिक कार्यकर्ते व पुरस्कर्ते विवेवेक कुबल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी कुबलवाडा व माणिकचौक मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu