मठ येथील इमारतींचे उद्घाटन

नूतन मराठा हितवर्धक संघ (रजि.) मुंबई या संस्थेच्या मठ येथील रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूलच्या आवारात जनरल इन्शोरन्स कॉर्पोरेशन, मुंबईच्या आर्थिक मदतीतून व संवर्धन प्रतिष्ठान, मुंबईच्या सौजन्याने उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ ऑक्टोबर रोजी झाले. या इमारतीत असणा­या दोन्ही सभागृहांचा उपयोग पंचक्रोशीतील मुलांना तांत्रिक शिक्षण व इतर व्यावसायिक आणि व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे. कोकणातील मुलांना व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणासाठी मुंबई-पुणे सारख्या शहरात जावे लागू नये त्यामागील उद्देश आहे. उद्घाटनप्रसंगी नूतन मराठा हितवर्धक संघाचे अध्यक्ष मेघनाथ पाटकर, चिटणीस दीपक वराडकर, सरपंच तुळशीदास ठाकूर, सचिन वालावलकर, किशोर पोतदार, आबा मठकर, रमेश पिगुळकर, सुनिल जाधव, प्रा. वामन गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Leave a Reply

Close Menu