आरवली रुग्णालयात कॉम्प्युटराईज्ड दंतचेअर

अमेरिका येथे वास्तव्यास असलेले डॉ. सुभाष रेगे यांनी सुमारे ३ लाख किमतीची दंत चिकित्सेसाठी आवश्यक असलेली कॉम्प्युटराईज्ड चेअर आरवली येथील आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रामध्ये सुपूर्द केली आहे. याचा शुभारंभ २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करण्यात आला. शुभारंभप्रसंगी दंततज्ज्ञ डॉ.महेश पेडणेकर, डॉ.डी.टी.शिवशरण, सुधाकर राणे, एकनाथ केरकर, यशवंत फटनाईक व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कॉम्प्युटराईज्ड चेअरही अद्ययावत वैशिष्ट्यांनी बनविलेली आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच रुग्णांना आवश्यक अशा या देणगीबद्दल आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रातर्फे डॉ.सुभाष रेगे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Close Menu