स्वच्छ सर्वेक्षणात वेंगुर्ला नगरपरिषदेचा १६वा व ८वा क्रमांक

वेंगुर्ला न.प.ने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटामध्ये पश्चिम विभागात १६वा व महाराष्ट्रात ८वा क्रमांक प्राप्त केला आहे. हे यश प्राप्त होण्यामध्ये शहरातील नागरिक, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांसह न.प.च्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचा-­यांनी भरीव कामगिरी केली. त्यामुळे नागरिकांसह हे सर्व श्रेय तुमचे आहे. यापुढेही सर्वांनी यापेक्षाही चांगले काम करुन देशात चांगला क्रमांक मिळवूया, असे यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी यांनी कार्यालयीन अधिक्षक, सफाई व महिला सफाई कर्मचारी, मुकादम, पाणी पुरवठा विभागात कर्मचारी, घंटा गाडीवरील कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी अशा प्रत्येक विभागातील एका व्यक्तीचा सत्कार केला. यात संगिता कुबल, बाबुराव जाधव, संतोष जाधव, मेघना घाटकर, नेहा पाटणकर, तुळशीदास नाईक आदींचा समावेश होतो.

                                        

Leave a Reply

Close Menu