शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सध्यातरी टळली

   वेंगुर्ला नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी वेंगुर्ला बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था केल्याने मार्केटसमोर होणारी वाहतुक कोंडीची समस्या सध्यातरी टळली असल्याचे दिसून येत आहे.

      भाजी विक्रेते मंडईमध्ये न बसता मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसायचे. ज्यामुळे मुख्य बाजारपेठ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत असे. या वाहतुक कोंडीवर उपाययोजना म्हणून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व भाजी विक्रेत्यांना पवनपुत्र भाजी मंडईमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व भाजी विक्रेत्यांना योग्य ती जागा आखून देण्यात आल्यामुळे मंडईमध्ये योग्यप्रकारे व्यवस्थापन होत आहे. तसेच आठवडा बाजारा दिवशी विक्रेते नियोजित ठिकाणी बसविण्यात आल्यामुळे गाडीअड्डा ते लकी स्टोअर्स आणि मुख्य बाजारपेठ रस्ता या ठिकाणी वाहतुक सुरळीतपणे सुरु राहिली. मुख्याधिकारी कंकाळ यांच्या नियोजनबद्ध कामाबद्दल वेंगुर्ला शहरातील नागरिक, प्रवासी, वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Close Menu