पेोंभुर्ल्यात कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज जांभेकर कुटुंबिय यांनी 21 व 22 जानेवारी रोजी कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. अवघे 35 वर्ष वय लाभलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक पहाण्यासोबतच सुधाकर जांभेकर व त्यांचे चिरंजीव बाजीराव व विक्रम जांभेकर यांनी सादर केलेल्या लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजीची प्रात्यक्षिके, जंगल सफारी, गावातील प्राचिन मंदिर दर्शन आणि जमलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या कलागुणांना वाव देणारा असा हा स्नेहमेळावा संपन्न झाला. यावेळी गावातील आपटे कुटुंबियांनी या निसर्गाच्या कुशीत शेळीपालन, गोशाळा आणि समृद्ध बाग फुलवून पोंभुर्ले गावात रोजगाराची संधी निर्माण केली आहे. एकिकडे खेडी ओस पडत असताना या तरुणांनी साकारलेला अभिनव उपक्रम कौतुकास पात्र आहे. अलिकडे सर्व स्तरावर गेट टुगेदर संपन्न होतात. परंतु आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दृष्टीक्षेपातील आठवणींसोबत झालेला हा कौटुंबिक स्नेहमेळावा विशेष अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Close Menu