भारतीय महिला फुटबॉल संघाच्या फिजीओपदी डॉ. साध्वी कोयंडे

वेंगुर्ल्याची सुकन्या डॉ. साध्वी सुमंत कोयंडे, पणजी-गोवा हिची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या फिजिओ पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त दि. 23 जानेवारी रोजी तिचा बेळगाव के.एल.इ. संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      फिजीओ क्षेत्रात मास्टर्स केलेल्या साध्वीने गोव्यातील नामांकित क्लब डेंपो, सेझा गोवा यांच्या ॲकॅडमीसाठी काम केलेले आहे. हल्लीच पंचकुला (हरियाणा) येथे झालेल्या खेलो इंडियासाठी तिने गोवा राज्य संघासाठी फिजीओचे काम केले होते. कामाचा अनुभव व जिद्द यामुळे तिची भारतीय संघात वर्णी लागली, असे के.एल.इ. संस्थेच्या प्राचार्यानी सत्कार समारंभात सांगितले. कु. साध्वी ही माजी उपनगराध्यक्ष कै. शेखर कोयंडे यांची पुतणी होय.

Leave a Reply

Close Menu