जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे यावर्षी पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षकांना जाहीर झाले आहेत. यात उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे, आदर्श गणित शिक्षक म्हणून विद्यामंदिर परुळेचे महेश चव्हाण, सरस्वती विद्यालय आरवली-टांकचे मुख्याधापक सी.एम.हरगुडे व उभादांडा नं.१ चे मुख्याध्यापक दिलीप माने यांची निवड केली होती. पुरस्काराचे वितरण ५ फेब्रुवारी रोजी वाडा-देवगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. गुणवंत अध्यापकाचे सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष वामन खोत, कार्यवाह तुकाराम पेडणेकर, तालुकाध्यक्ष देवानंद चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu