शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवतील

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे वेंगुर्ला येथे शिवगर्जना मेळावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदिप बोरकर, जिल्हापमुख संजय पडते, अतुल रावराणे, अतुल बंगे, महिला संफप्रमुख स्नेहा माने,बाळा गावडे, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, विवेक आरोलकर, मंजुषा आरोलकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर आदी उपस्थित होते.

हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शुन्यातून उभ्या केलेल्या शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न आज हे गद्दार करीत आहेत. गद्दारी शिवसेनेत यापूर्वीही झाली होती. ते सर्व आज भाजपच्या कळपात आहेत. येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील  जनता व शिवसैनिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन सुभाष देसाई यांनी केले. कोरोना काळात उध्दव ठाकरे सरकारने केलेले काम, पक्षाचे विचार घेवून आपल्याला तळागाळापर्यंत गेले पाहिजे व पुन्हा एकदा आपला भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन यावेळी प्रदिप बोरकर यांनी केले. यावेळी उपतालुका प्रमुखपदी तुकाराम परब, विभाग प्रमुखपदी संदिप पेडणेकर, उपविभाग प्रमुखपदी रविंद्र राऊळ, युवासेना उपशहर प्रमुखपदी वैभव फटजी, युवासेना शहर समन्वयकपदी कौशल मुळीक, उपशहर प्रमुखपदी शैलेश परुळेकर, मागासवर्गीय सेलच्या महिला शहर संघटिका म्हणून यशश्री जाधव, महिला अल्प संख्याक प्रमुखपदी अस्मित शेख, वेंगुर्ला शाखा संघटकपदी अंकिता केरकर, हर्षदा तुळसकर, तुळस उपसंघटक पदी नयना धुरी यांना सुभाष देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र पदान करण्यात आली. उपतालुका प्रमुख संजय गावडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu