भंडारी क्रिकेट स्पर्धेत वेंगुर्ला ‘ब‘ संघ विजेता

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने केवळ भंडारी समाजासाठी वेंगुर्ला कँम्प मैदानावर आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३ या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात वेंगुर्ला विरूध्द कुडाळ या संघात होऊन वेंगुर्ला संघाने १७ धावांनी सामना जिंकत रोख रु. २१ हजार व चषक पटकाविला. तर प्रतिस्पर्धी कुडाळ संघ उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

      सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने भंडारी समाजासाठी आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३ या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील सावंतवाडी अ, सावंतवाडी ब, कुडाळ अ, कुडाळ ब, दोडामार्ग, मालवण अ, मालवण ब, वेंगुर्ल अ, वेंगुर्ल ब असे जिल्ह्यातून ९ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सामनावीर सुरेश मांजेरकर, मालिकावीर, सुरज करलकर (कुडाळ संघ), उत्कृष्ट गोलंदाज संतोष शेटकर (कुडाळ), उत्कृष्ट फलंदाज राजन केरकर (वेंगुर्ला), उत्कृष्टक्षेत्ररक्षक साईल वेंगुर्लेकर (कुडाळ ब) व उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर (वेंगुर्ला ब संघ) यांना महासंघाच्यावतीने चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधीर सारंग, बबी कानडे, प्रमोद भोवर, उदय म्हाडदळकर यांनी, समालोचक म्हणून संतोष मर्ये, मंथन परब, ऋतुराज खाजणेकर, गुणलेखक म्हणून विशाल मर्ये, ओंकार मर्ये, यशवंत किनळेकर यांनी काम पाहिले.

     बक्षिस वितरणप्रसंगी रमण वायंगणकर, अॅड. श्याम गोडकर, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, विकास वैद्य, बाबली वायंगणकर, जयराम वायंगणकर, राजू गवंडे, प्रा.संजय खडपकर, समील जळवी, जयप्रकाश चमणकर, दिपक कोचरेकर, सरपंच निलेश चमणकर, सुनील नाईक, लक्ष्मीकांत मुंडये, दादा वराडकर, गजानन गोलतकर, श्रेया मांजरेकर, अंकिता बांदेकर, सदानंद केरकर, भरत आवळे, बाळ चोडणकर, चंद्रकांत वाडकर, अशोक नाईक, संतोष वैद्य, सत्यवान साटेलकर, विलास मांजरेकर, जया चुडनाईक, रामेश्वरी गवंडे, यशवंत किनळेकर, सुजीत चमणकर, निलेश गोवेकर, मनोहर पालयेकर, कमलाकांत नवार यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu