ठाकरे शिवसेनेतर्फे गुणवंतांचा सत्कार

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेंगुर्लातर्फे साई डिलक्स हॉल येथे तालुक्यातील दहावी, बारावीतील सुमारे १०३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी लोकसभा संफ प्रमुख अरूण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा महिला संघटक जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, जिल्हा युवा सेनाप्रमुख मंदार शिरसाट, मुंबई उपविभाग प्रमुख परब, विजू गावडे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, अॅड.जी.जी.टांककर, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, पंकज शिरसाट, संदिप पेडणेकर आदी उपस्थित होते.  वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब व येथील सर्व कार्यकर्ते केवळ राजकारण न करता लोकसभा मतदार संघ संफ प्रमुख अरुण दूधवडकर व विधानसभा मतदारसंघ संफप्रमुख शैलेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना अभिप्रेत असे सामाजिक कार्य करीत आहेत. हे अभिमानास्पद असून त्यांनी हे कार्य असेच पुढे सुरू ठेवावे असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. दरम्यान, शैलेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

 

Leave a Reply

Close Menu