वाचनाने वैचारिक, सामाजिक व मानसिक विकास

नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेने सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकात्ता यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी १९ जून ते १८ जुलै २०२३ हा कालावधी डिजिटल वाचन दिवस, वाचन आठवडा, वाचन महिना म्हणून साजरा करावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार १८ जुलै रोजी सदानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल वाचन दिवस साजरा करण्यात आला. कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविकात डिजिटल वाचनाचे फायदे व महत्त्व सांगितले. त्यानंतर रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काही प्रसिद्ध पुस्तकांचे उतारा वाचन केले. पवार यांनी प्रसिद्ध साहित्यिक व.पू.काळे यांच्या एक सिगल चहाया कथेचे अभिवाचन केले. देश-परदेशात जे विचारवंत संशोधक घडले त्यांनी वाचनाने आपले ज्ञान वाढविले. वाचनाने वैचारिक, सामाजिक व मानसिक विकास होतो असे प्रतिपादन राजेश शिरसाट यांनी केले. यानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेत जॉयसी फर्नांडी (प्रथम), अस्मिता दाभोलकर (द्वितीय) व नेहल परब (तृतीय) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

     निबंध स्पर्धेचे परिक्षण संस्थेचे उपकार्यवाह माया परब यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजचे प्रा. विलास गोसावी, रेगे ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.महेश बोवलेकर यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu