न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच्या निर्देशाप्रमाणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश डी. वाय.रायरीकर यांनी मध्यस्थी प्रक्रिया-काळाची गरज व मध्यस्थी प्रक्रिया-महत्त्व व फायदे यावर तर अॅड.के.आर.पराडकर यांनी मध्यस्थी प्रक्रिया-विधिज्ञांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करताना अॅड.एस.पी.बावीस्कर यांनी आंतरराष्ट्रीय न्याय यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार लिपिक एस.एस.घोगळे यांनी मानले. कार्यक्रमाला वकिल, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी मिळून ५० जण उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu