दत्तक पालक अंतर्गत ४२ विद्यार्थी दत्तक

         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला मार्फत शिक्षक समितीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दत्तक पालक उपक्रम सलग दुस­या वर्षी राबविण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील १४ केंद्रामधून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण ४२ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. शिक्षक समितीच्या शिलेदारांनी या उपक्रमासाठी स्वयंस्फूर्तीने निधी जमा केला. या निधीमधून समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  उद्घाटन शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, कोकण विभाग सरचिटणीस संतोष परब, जिल्हा सचिव सचिन मदने, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष लवू चव्हाण, सुरेखाताई कदम, पं.स.माजी सभापती जयप्रकाश चमणकर, समितीचे तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, सचिव प्रसाद जाधव, प्रवक्ते भाऊ आजगावकर आदी उपस्थित होते.

     शिक्षक समितीसाठी आपली संपूर्ण कारकिर्द ज्यांनी समर्पित केली अशा सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच बदलीमुळे वेंगुर्ला तालुक्यात सेवा बजावून दुस­या तालुक्यात गेलेले आणि तालुका बदलून वेंगुर्ला तालुक्यात आलेले शिक्षक बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोकण विभाग सरचिटणीसपदी नवनियुक्त झालेले संतोष परब, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाच्या अध्यक्षपदी निवड झालेले राजू वजराटकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी वेंगुर्ला संचालकपदी निवड झालेले सिताराम लांबर, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनोद मेतर यांचा सत्कार करण्यात आला.

     या सोहळ्याचे औचित्य साधून समितीचे नूतन तालुकाध्यक्ष म्हणून सिताराम नाईक, उपाध्यक्ष म्हणून कर्पूरगौर जाधव, सहसचिव म्हणून रविद्रनाथ गोसावी, तालुका संफ प्रमुख म्हणून रामचंद्र झोरे यांची नावे जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम नाईक आणि ऋतिका राऊळ यांनी केले. आभार कर्पूरगौर जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu