शैक्षणिक उठावाला कला क्षेत्राचे सहकार्य

दत्तमाऊली दशावतार मंडळ गावोगावी फिरून दशावताराचे प्रयोग करून मिळणा-या तुटपुंज्या मानधनातील काही रक्कम समाजपयोगी उपक्रमांसाठी वापरत आहेत. शैक्षणिक उठावासाठी त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार म्हापण-मळई शाळेचे मुख्याध्यापक उमेश निवतकर यांनी वह्या वितरण प्रसंगी काढले.   

      ‘प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रैवर्षे पूर्तीचाअंतर्गत ३ ऑगस्टरोजी दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशिय मंडळातर्फे मंडळ जिल्हापरिषद शाळा म्हापण-मळई आणि केळुस खुडासू या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचे संस्था अध्यक्ष  सीताराम उर्फ बाबा मयेकर, शिवप्रसाद मेस्त्री, दत्तप्रसाद शेणई, स्वप्नील नाईक, रामचंद्र रावले, सुशांत वेंगुर्लेकर, संकेत कुडव, न्हानू कोरगांवकर, नाना केळूसकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सिया सिद्धेश मार्गी, शिक्षक अनुष्का मालवणकर, केळुस-खुडासु शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र कोनकर यांच्यासह ग्रामस्थ रामचंद्र धुरी आणि हरी धुरी उपस्थित होते. दशावतार संस्था वह्या वाटप करते हा उपक्रम माझ्या पहाण्यातील पहिलाच असल्याचे शिक्षिका अनुष्का मालवणकर यांनी सांगितले. दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी मंडळाचे आभार मानले.

Leave a Reply

Close Menu