खंबीर नेतृत्व पाठीशी असल्याने पक्ष लोकाभिमुख काम करेल

कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे राष्ट्रवादीची पत्रकार परिषद आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले की, शरद पवार आपले दैवत असले तरी अजित पवार यांनी सत्तेत गेल्याशिवाय जनतेची कामे होणार नाहीत ही भूमिका घेत निर्णय जाहीर केला या निर्णयाला आपण बांधील राहिलो. अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी असल्याने लोकाभिमुख काम आपला राष्ट्रवादी पक्ष करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, जेष्ठ नेते एम.के.गावडे, जिल्हा बँक माजी संचालक प्रज्ञा परब, प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, कणकवली शहर अध्यक्ष कणकवली इम्रान शेख, कुडाळ, मालवण विधानसभा युवक अध्यक्ष सर्वेश पावसकर, माजी ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वरने, वेंगुर्ल माजी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, सुभाष तांडेल, युवक अध्यक्ष सुरज परब, अॅड.प्रमोद धुरी, पेंडूर सामाजिक कार्यकर्ते नाना गावडे, माजी उपसरपंच प्रमोद शिरोडकर आदी उपस्थित होते.

      सहकार क्षेत्रातील जेष्ठ एम.के.गावडे व महिला काथ्या उद्योगासारखा प्रकल्प राबवून जिल्ह्यातील अनेक महिलांना रोजगार देणा­या प्रज्ञा परब यांच्यासारखे अनुभवी व्यक्ती पक्षाच्या पाठीशी ठाम उभी आहेत. जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या काळात आठही तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करणार असून सर्वसामान्य लोकांना न्याय देता येईल यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी सोबत यावे व जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष बलशाली करावा. तर कार्याध्यक्ष काका कुडाळकर म्हणाले, आपण राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेलो नाहीत. संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी जी भूमिका घेऊन सत्तेत समाविष्ट झाले त्यांचे नेतृत्व मान्य करून कुडाळ, सावंतवाडी मतदार संघाची जवाबदारी आपण घेतली आहे. राष्ट्रवादी पक्ष काही काळ मागे पडला होता त्यांना महायुतीच्या माध्यमातून बळ देण्याचे काम करणार असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्ह्यातील प्रमुख नियुक्त्या करणार असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Close Menu