‘घन ओथंबून येती‘ मध्ये अनुभवला कवितांचा पाऊस

   आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांचा घन ओथंबून येतीहा पावसाळी कवितांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात उपस्थितांनी  प्रस्थापित कवींच्या कविता तसेच स्वरचित कविता वाचून आणि गाऊन सादर केल्या. सध्या निसर्गाची समृद्ध आणि सुंदर रूपे तसेच पावसाची विविध रूपे आपण पाहात आहोत. पण अत्यंत चैतन्यमयी वातावरणात कल्पनांचे घन ओथंबून आलेले असताना कवितेतून समोर उभी ठाकलेली पावसाची व निसर्गाची विविध रूपे अनुभवणे हे रंजक व आनंददायी होते. यावेळी महेश राऊळ, संजय पाटील, अजित राऊळ, जान्हवी कांबळी, डॉ. संजीव लिंगवत, दिव्या आजगावकर, राजश्री परब, डॉ. पूजा कर्पे, रश्मी भगत, प्रितम ओगले, स्वप्निल वेंगुर्लेकर, देवयानी आजगावकर, प्रदीप केळुसकर, प्रसाद खानोलकर, फाल्गुनी नार्वेकर, वृंदा वैद्य, संकेत येरागी, सोमा गावडे, वासुदेव पेडणेकर आदींनी कविता सादर करून वाहवा मिळवली. तर अध्यक्ष कवी  सुधाकर ठाकूर यांनी आपल्या कविता सादर केल्या. व्यासपीठावर सुधाकर ठाकूर, अजित राऊळ, प्रदीप केळुसकर, वृंदा वैद्य, संतोष वालावलकर, वृंदा कांबळी, सचिन परूळकर, पांडुरंग कौलापुरे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी प्रा. सचिन परूळकर, संजय पाटील, महेश राऊळ, विवेक तिरोडकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्र्यंबक आजगांवकर, भाऊ केरकर, सीताराम टाककर, वृंदा गवंडळकर, विकास कांबळी, चारूशीला दळवी, चैतन्य दळवी, सुनिल जाधव आदी रसिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu