विविध वेशभूषांनी क्रांतीदिन साजरा

 क्रांतीदिनाचे औचित्य साधून उभादांडा-नवाबाग या प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. पहिली ते चौथीमध्ये प्रथम-चार्वी कोळंबकर (ताराबाई), द्वितीय-लावण्या गोकरणकर (अहिल्याबाई होळकर), तृतीय-साई कुबल (साने गुरूजी), पाचवी ते सातवीमध्ये प्रथम-गाथा कोळंबकर (जिजाबाई), द्वितीय-तन्मय मोर्जे (लोकमान्य टिळक), तृतीय-मैथिली केळुसकर (आनंदीबाई जोशी) व प्रज्ञा आरावंदेकर (सावित्रीबाई फुले) यांनी क्रमांक पटकाविले. तर विघ्नेश केळुसकर (शिवाजी महाराज), मनिष मोटे (साने गुरूजी), चिन्मयी मोर्जे (झाशीची राणी), तनिष गिरप (डॉ.आंबेडकर), ओंकार केळुसकर (सैनिक) यांनीही वेशभूषा सादर करून स्पर्धेत रंगत आणली.

      मुख्याध्यापक प्राजक्ता आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक रामा पोळजी यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेचे परिक्षण मारूती गुडुळकर यांनी केले. यावेळी अंगणवाडीसेविका स्नेहल आरावंदेकर, मदतनीस अश्विनी बागायतकर व  पालक उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा केळुसकर, जि.प.सदस्य दादा कुबल व अन्य पालक, ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu