ओडीएफप्लस २साठी आडेली ग्रामपंचायतीची निवड

  स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ओडीएफप्लस २ साठी वेंगुर्ला तालुक्यातून आडेली या एकमेव ग्रा.पं.ची निवड झाली आहे. या अंतर्गत मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, घरोघरी शौचालय, शोषखड्डे, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, प्लास्टिक मुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, बायोडिग्रेडबल कचरा, नॉन बायोडिग्रेडेबल कचरा वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्था व भंडारवाडा महसूल गावातील १५ कुटुंबे आदींची पाहणी केली. यावेळी केंद्रस्तरीय कमिटी प्रमुख कमला यादव, जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण मिशनचे श्री.मठकर, श्री.किनळेकर, सरपंच यशस्वी कोंडसकर, स्वच्छता मिशन पर्यवेक्षक द्रौपदी नाईक, सी.आर.पी.अर्पिता होडावडेकर, उपसरपंच परेश हळणकर, ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण, ग्रा.पं.सदस्य प्रमोद गवळी, वर्षा आडेलकर, आरोग्यसेवक शेखर कांबळी, महिला बचतगट सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आडेली ग्रा.पं.चे काम चांगले असल्याबद्दल कमिटीने समाधान व्यक्त केले. तसेच सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Close Menu