बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला तालुका क्रीडा बहुविध परिषद आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत एकूण तीन गटांत घेतलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत ५० स्पर्धक सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन नंदन वेंगुर्लेकर व गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसिलदार संदिप पानमंद, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिदे, संजय परब, जयराम वायंगणकर, किशोर सोनसुरकर, श्री.वाले, श्री.घोडेपाटील, श्री.चव्हाण, श्री.खरबडे, श्री.पाटील, प्रभू पंचलिग, क्रीडा मार्गदर्शक जयवंत चुडनाईक, संजिवनी चव्हाण आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात वकिलीची सनद व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर या व्यापार, उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या कार्यकारिणी समितीच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नंदन वेंगुर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.

    १४ वर्षाखालील मुलींमध्ये- समिधा वसंत पवार (दाभोली इंग्लिश स्कूल), सोनल संदिप मराठे (शिवाजी हाय. तुळस), विशाखा प्रभू पंचलिग (परुळे विद्यामंदिर), अनुष्का मिलिद राऊळ व सृष्टी यशवंत गोलतकर (दाभोली इंग्लिश स्कूल), मुलांमध्ये रोहित निळकंठ गडेकर (शिवाजी हाय. तुळस), साईराज विनय सामंत (वेंगुर्ला नं.३), चिन्मय शशांक मराठे व विराज मनोजकुमार बेहरे (वेंगुर्ला हाय.), राजस विलास राऊळ (परुळे विद्यामंदिर), १७ वर्षाखालील मुलींमध्ये सुरूची संदिप मराठे (शिवाजी हाय. तुळस), राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर (न्यू इं. स्कूल उभादांडा), हेतल दिनेश कोंडुरकर (दाभोली इंग्लिश स्कूल), कोमल संजय नाईक (शिवाजी हाय.तुळस), मालविका सुरेंद्र वारंग (अणसूर-पाल हायस्कूल), १७ वर्षाखालील मुलांमध्ये सोहम रविद्र राऊळ (परुळे विद्यामंदिर), अथर्व नित्यानंद मांजरेकर (एम.आर.देसाई स्कूल), अर्थव रमेश राऊळ (परुळे विद्यामंदिर), निखिल निलेश दाभोलकर (न्यू इं.स्कूल दाभोली), साईश संदिप केरकर (वेतोरे हाय.), १९ वर्षाखालील गटात आनंद किरण कारेकर यांनी यश मिळविले. स्पर्धेचे पंच म्हणून प्रदिफमार प्रभू व सावंतवाडी येथील मुक्ताई अॅकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी काम पाहिले. यापुढे कुस्ती, योगा, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, मैदानी व शालेय फुटबॉल आदी स्पर्धा ३० ऑक्टोबरपर्यंत संपन्न होणार आहेत. यातील विजेत्या स्पर्धकांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता होणार आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu