शिरोडा रूग्णालयात डॉक्टरांची नियुक्ती

 शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोगतज्ज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. यासाठी त्यांना गोवा किवा इतर शहराच्या ठिकाणी जाव लागत असे यात गरीब व गरजू ग्रामस्थांचे हाल होत असत हा सर्व विषय लक्षात घेऊन रेडी जि.प. माजी सदस्य तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना ब­याच वेळा हा विषय लक्षात आणून डॉक्टरची मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी ५ ऑगस्ट रोजी या संदर्भात लेखी पत्र दिले होते व पूर्वीप्रमाणे पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला यश येऊन डॉ.श्रीपाद पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधी मंडळशी चर्चा करून बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रविण देसाई आठवड्याचे तीन दिवस, सर्जन डॉ.वजराटकर आठवड्याचे तीन दिवस व स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एक दिवस देण्याचे मान्य केले आहे.

    यामुळे शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या महत्वाच्या डॉक्टर विषयी मागण्या पूर्ण झाल्या आहेत अशी माहिती प्रितेश राऊळ यांनी दिली आहे. याबाबत शिरोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच राहुल गावडे, भाजप रेडी जि.प.विभाग प्रमुख अमित गावडे, रेडी ग्रामपंचायत सदस्य आनंद भिसे यांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

Leave a Reply

Close Menu