जुनाट चालीरिती मोडून प्रगती साधा-नांदोसकर

वेंगुर्ला तालुका तेली समाज उन्नत्ती मंडळाच्या वतीने ज्ञातीतील दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ६ ऑगस्ट रोजी दाभोली येथे संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पेडणेकर, शुभदा डिचोलकर यांसह ज्ञातीबांधव भगिनी उपस्थित होते. दाभोली महिला मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सुधीर डिचोलकर, प्रकाश आरोलकर, महादेव आरोलकर, वामन आरोलकर आदींचे सहकार्य लाभले. पालकांनी आपल्या वर्तणुकीने मुलांसमोर आदर्श निर्माण करावा. विकासाच्या आड येणा­या जुनाट चालीरिती मोडून इतर समाजातल्या सुद्धा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा व प्रगती साधा असे आवाहन जे.जे.आर्टस्चे निवृत्त प्राध्यापक सुनिल नांदोसकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu