डॉ. भा. वा. आठवले यांची ‘माझी फ्रान्स भेट’ पुस्तकाचे प्रकाशन

देवगड येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भा. वा. आठवले (वय 95) यांचे ‘माझी फ्रान्सभेट’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले असून कोल्हापूर येथ्ील अभिनंदन प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध झाले आहे.   फ्रान्स मित्र मंडळ, पुणे आणि परस्पेक्टिव्ह एशिया पॅरिस या दोन संस्थांच्या विद्यमाने सन्माननीय पाहुणे म्हणून त्यांची फ्रान्स भेटीसाठी निवड झाली होती. केवळ टुरिस्ट म्हणून ते फ्रान्सला गेले नव्हते. फ्रान्स आणि भारत यांनी एकमेकांना समजून घ्यावे परस्पर सौर्हादपूर्ण संबंध वाढावे या हेतूने ही निवड झाली होती. फ्रान्समधील एक महिन्याच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रमामधून ह्या फ्रान्सभेटीवर आधारित हे वेगळ्या अनुभवावर असे हे पुस्तक आहे.

Leave a Reply

Close Menu