कॅम्प कॉर्नर मंडळास रूग्णवाहिका

वेंगुर्ला शहरातील नागरिकांची रूग्णवाहिकेअभावी होणारी परवड लक्षात घेता कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा सेनेचे शहरप्रमुख उमेश येरम यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे रूग्णवाहिकेची मागणी केली होती. त्यानुसार केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या सी.एस.आर.मधून ही अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी कॅम्प कॉर्नर मित्रमंडळास अत्याधुनिक रूग्णवाहिकेच्या चाव्या प्रदान केल्या.  यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनिल मोरजकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शहर युवक प्रमुख संतोष परब, महिला शहर प्रमुख अॅड. श्रद्धा बावीस्कर-परब, अल्पसंख्यांक महिला संघटक शबाना शेख, रविना राऊळ, मनाली परब, कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे राजू परब, संजय परब, प्रदीप परब, बाळा परब, श्याम वालावलकर, भाऊ वालावलकर, सुनिल परब, आनंद शिरोडकर, विलास परब, देवीदास वालावलकर, अॅड.एन.जे. गोडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ही रूग्णवाहिका शहरातील कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाला दिली असली तरी तिचा उपयोग तालुक्यातील रुग्णासाठी होणार असून रूग्णांना सवलत दरात ती सेवा देण्यास उपलब्ध असेल असे उमेश येरम यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Close Menu