वायंगणी येथे ‘आनंदाचा शिधा‘चे वितरण

महाराष्ट्र सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून १०० रूपयांमध्ये दिवाळीसाठी आवश्यक वस्तू दिल्या आहेत. वायंगणी-तळेकरवाडी धान्य दुकानावर प्रसन्ना देसाई व सुहास गवंडळकर यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा‘ वितरीत करण्यात आला. यावेळी शामसुंदर मुणनकर, मिना मळकर, प्रताप करंगुटकर, यशोदा तांडेल, सुनिता केळुसकर, भागिरथी कुडव, विष्णू धोंड, सदानंद पेडणेकर, नाना कोळेकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu