शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रा.सुकी यांचा सन्मान

शिक्षक ध्येय संस्थेकडून राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धेत श्री सातेरी हायस्कूलचे प्रा.चैतन्य सुकी यांनी सादर केलेल्या नवोपक्रमास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते त्यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान कार्यक्रम वेतोरे येथील श्री सातेरी हायस्कूल व व कै.सौ.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनावेळी संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक संजय परब, संगीत शिक्षक निलेश पेडणेकर, दिप्ती प्रभू यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.सुकी यांच्या संकल्पनेतून सिधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव वेतोरे महाविद्यालयात नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा साकारण्यात आली असून दरवर्षी २२ डिसेंबरला थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त येथे गणित जत्रेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण प्रसारक समितीचे कार्यवाह प्रभाकर नाईक यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu