लोकअदालतीमध्ये ८१ प्रकरणे निकाली

वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात ९ डिसेंबर रोजी घेतलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणीकडील ३, फौजदारी १२ तर ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व विद्युत विभाग यांच्याकडील ६६ अशी एकूण ८१ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवून ३ लाख २७ हजार ११ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार संघटना, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या लोकअदालतीचे उद्घाटन वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील, पॅनेल सदस्य अॅड.एस.जी.ठाकूर व पक्षकारांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एस.एस.कांबळे, एस.एच.खेडेकर, वकील, पक्षकार व न्यायायलीन कर्मचारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Close Menu