पवार यांच्या वाढदिनी खेळाचे साहित्य वितरीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांच्यावतीने कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील अंगणवाडीच्या मुलांना खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ला शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, सचिव स्वप्निल रावळ, नितेश कुडतरकर, सुहास मांजरेकर, महेश वेंगुर्लेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेकानंद आरोलकर, मुख्याध्यापक प्रतिमा पेडणेकर यांसह अन्य शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. नम्रता कुबल यांनी शरद पवार यांच्या कार्याची माहिती दिली. तर खेळाचे साहित्य दिल्या बद्दल मुख्याध्यापक पेडणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Close Menu