‘चिवचिव गाणी‘ या पुस्तकाचे प्रकाशन

 साने गुरूजी कथामाला प्रकाशनतर्फे पूज्य साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक रमेश सावंत यांच्या ‘चिवचिव गाणी‘या पुस्तकाचे प्रकाशन १२ डिसेंबर रोजी साने गुरुजी विद्यालय, दादर-मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर, साने गुरुजी कथामाला, वरळीचे उपाध्यक्ष रमेश वरळीकर, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब गढरी, त्यांचे सहकारी शिक्षक तसेच कोमसापच्या चेंबूर शाखेचे अध्यक्ष रविकिरण पराडकर, ज्येष्ठ लेखक चंद्रकांत गांगण, ज्येष्ठ कवी चंद्रकांत कवळी, कवी संतोष खैरे आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बालसाहित्यिक रमेश तांबे यांनी सादर केलेल्या ‘क कवितेचा‘ या कार्यक्रमाने रंगत आणली.  कवी रमेश सावंत यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या बालकवितेची प्रेरणा आणि सृजन याबद्दलचे अनुभव मांडले आणि साने गुरुजी यांचे विचार आणि आदर्श आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचे आहेत हे सांगितले. कवी सुकुमार नितोरे यांनी कवी रमेश सावंत यांच्या कवितांचे सादरीकरण केले. अशोक लोटणकर यांनी आपल्या भाषणात कवी रमेश सावंत यांच्या बालकविता मुलांसाठी किती आकर्षक आणि प्रभावी आहेत हे सांगताना पुस्तक पाहून त्यांच्या नातवाला अतीव आनंद झाला याचे वर्णन केले.

Leave a Reply

Close Menu