‘मोबाईल माझा गुरू‘ बालकथासंग्रहाचे प्रकाशन!

नागेश शेवाळकर लिखित ‘मोबाईल माझा गुरू‘ या बालकथा संग्रहाचे प्रकाशन आजरा येथे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले. बालकांसाठी होणारा मोबाईलचा अतिरिक्त वापर हा भविष्यात धोकादायक ठरू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी सुभाष विभुते, सुनील सुतार, प्रकाश ठाणेकर तसेच पुष्पलता घोळसे आदी उपस्थित होते. या बालकथासंग्रहातील कथा केवळ मनोरंजन करत नाहीत तर बालकांना मार्गदर्शन करतात. हा कथासंग्रह अधिकाधिक बालवाचकांच्या हातात पोहोचावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी अत्यंत अल्प किमतीत प्रकाशित केला असल्याचे डॉ.शिवशंकर उपासे यांनी सांगितले. सूत्रसंचालन पूजा नेवरेकर तर आभार बलवंत शिंत्रे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu