चित्तथरारक समई नृत्याचा आविष्कार

भांडुप पश्चिमेच्या कोकण नगरातील स्व.अटल बिहारी वाजपेयी मैदानावर कोकण महोत्सवाचे मुख्य आयोजक सुजय धुरत व दिलीप हिरनाईक चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली २६व्या  कोकण महोत्सवात मुंबई भांडुपमध्ये प्रथमच देवगड येथील नाद-भोळेवाडी गावातील महिलांना समई नृत्य करण्याची संधी मिळाली. अंगणवाडी सेविका रसिका पाष्टे, मेघा पाष्टे, प्रगती मटकर, सुलोचना मटकर, करुणा मटकर, आरती पवार, मयूरी आंग्रे, जयवंती पाष्टे, भारती गराटे या महिलांचा समावेश होता. समईमध्ये तेलवात घालून ती पेटती समई आपापल्या डोक्यावर ठेवून अलगद चित्तथरारक नृत्य सादर करताना डोक्यावर समई व दोन्ही हातामध्ये निरंजन अशा विविध कसरती करून गाण्याच्या ठेक्यावर गोलाकार नृत्य करुन आपला तोल सावरण्याचे कौशल्य महिलांनी अप्रतिमरित्या दाखविले. या कार्यक्रमासाठी नाद-भोळेवाडी ते मुंबई संपूर्ण प्रवास खर्च व आर्थिक मदत भाजपाचे सरचिटणीस संदिप साटम व बंड्या नारकर यांनी केली होती. देवगड येथील नाद-भोळेवाडी गावातील महिला या सर्व शेतकरी मोलमजुरी करणा­या आहेत. भोळेवाडी शाळेत महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात या महिलांचा  सहभाग होता. शाळेच्या शिक्षिका कै. कल्पना बेनके यांनी या महिलांना एकत्र करून समई नृत्य शिकवले. माजी सरपंच संतोष बाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला समई नृत्याचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२२ रोजी नवलादेवी मंदिर, नाद येथे झाला. आतापर्यंत या महिलांनी ७४ प्रयोग केले आहेत. रसिका पाष्टे या महिलांना समईनृत्य शिकविण्याचे काम करतात.

Leave a Reply

Close Menu