अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेच्यावतीने वेंगुर्ला-पेंडूर, पेंढ­याचीवाडी या प्राथमिक शाळेत मुलांसाठी ‘अज्ज्याच मज्जा! मुलांच्या राज्यात!‘ हा मालवण कथामालेचा कार्यक्रम संपन्न झाला. गोष्टी, गप्पा, गाणी, अभिनय गीत प्रबोध, परिकथा, ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा आदींचे सादरीकरण मुलांसमोर करण्यात आले. यात कथामालेच्यावतीने सुरेश ठाकूर, सदानंद कांबळी, विजय चौकेकर, सुरेंद्र सकपाळ, चंद्रशेखर हडप आदी ज्येष्ठ कथामाला कार्यकर्त्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर तसेच सहकारी शिक्षक मुकुंद काळोजी, समीर तेंडोलकर यांनी विशेष सहाय्य केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष गौरी पटनाईक यांनी विशेष आयोजन केले. मुख्याध्यापक देवयानी आजगावकर तसेच जिविका हरमलकर, केयांश हरमलकर, साईश पटनाईक आदी विद्यार्थ्यांनी विशेष गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.

Leave a Reply

Close Menu