हा राजकारणाचा विषय नाही – नारायण राणे

देशभरात अयोध्येच्या राममंदिरचीच चर्चा आहे. लोक भारावून गेले आहेत. ५०० वर्षांत जे शक्य झाले नाही ते आता २०२४ मध्ये शक्य झाले. हा वेगळा आनंद आहे. एक समाधान आहे. इथे पक्ष, जात, धर्म याचा प्रश्न नाही. आपल्या रामाची प्रतिष्ठापना होत आहे याचा आनंद सर्वांना असायला पाहिजे. हा राजकारणाचा विषय नाही आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ला येथे केले.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले मंदिर स्वच्छता अभियान १४ जानेवारीपासून सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज २१ जानेवारी रोजी वेंगुर्ला सातेरी मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हस्ते स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.

          यावेळी संबोधित करताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, २०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी त्याठिकाणी राम मंदिर बनविण्याचा निर्धार केला. २२ जानेवारी रोजी श्री रामाची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. आपल्या देशातील जो इतिहास आहे त्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहिणारा हा क्षण आहे. सिधुदुर्गासहीत वेंगुर्ल्यातील कार्यकर्ते ही धार्मिक आहे. प्रामाणिक आणि निष्ठेचे वलय तुमच्यामध्ये आहे. याचा प्रत्यय तुम्ही आम्हाला देता आहात. ज्याला आपला देव वाटेल त्यांनी या, त्याला नमस्कार करा आणि कृतज्ञ भावनेने विनम्र व्हा. देशभरातील सध्याचे वातावरण निर्माण व्हायला आपण सर्वजण कारणीभूत आहात. तुम्ही सर्व आलात. हातभार लावलात. मंदिर स्वच्छ झाले. वातावरणा प्रसन्न झाले. याचे श्रेय हे तुम्हाला असल्याचे मंत्री नारायण राणे म्हणाले.

          यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, भाजपाचे प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, प्रणव वायंगणकर, जयवंत मोंडकर, हेमंत गावडे, पुंडलिक हळदणकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रशांत आपटे, सातेरी देवस्थानचे दाजी परब, रवी परब, सुनिल परब, सुधाकर परब, प्रसाद परब, सहदेव परब, जयवंत परब, संजय परब, राजन परब, सुनिल परब, स्वप्निल परब, वासुदेव परब, मंगेश परब, रविद्र परब, नितेश परब, उमेश परब, निखिल घोटगे, सुशेन बोवलेकर यांच्यासह भाजपाच्या महिला पदाधिकारी प्रज्ञा परब, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, सुजाता पडवळ, सुजाता देसाई आदी व अन्य तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात कारसेवक प्रशांत धोंड यांचा सन्मान नारायण राणेंच्या हस्ते करण्यात आला. ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरच्या उर्वरित बांधकामासाठी निधी मिळावा अशा आशयाचे निवेदन यावेळी ट्रस्टतर्फे श्री. राणे यांना देण्यात आले.

Leave a Reply

Close Menu