अभिवाचन स्पर्धेत ‘अपहरण‘ तृतीय

रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगांव आणि फिनिक्स क्रिएशन्स, कोल्हापूर तर्फे पूज्य पुरूषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य महोत्सव-अभिवाचन स्पर्धा-२०२४ची प्राथमिक फेरी २६ जानेवारी रोजी फिनिक्स हॉल, कोल्हापूर केंद्र येथे संपन्न झाली. स्पर्धेत सांघिकमध्ये थिएटर आर्टस्-कोल्हापूर (प्रथम), परिवर्तन कला फाऊंडेशन-कोल्हापूर (द्वितीय), कलावलय-वेंगुर्ला व स्वच्छंद अभिनय समुह-कोल्हापूर (तृतीय) यांनी क्रमांक पटकाविला. कलावलय या संस्थेतर्फे सीमा मराठे, शशांक मराठे व चिन्मय मराठे यांनी अपहरणया कथेचे अभिवाचन केले. चिन्मय मराठे याला वैयक्तिक उत्तम वाचिक अभिनय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण यशोधन गडकरी व जयप्रकाश पाटील यांनी केले.

 

 

Leave a Reply

Close Menu