पाण्यात उभे राहून अनोखे आंदोलन

शिरोडा-वेळागर येथील अल्पभूधारक गरीब शेतक-यांवर १९९० सालापासून सरकारकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध व ताज प्रकल्प संपादित क्षेत्रातून नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्यासाठी शिरोडा-वेळागर शेतकरी संघटनेच्यावतीने शेकडो भूमिपुत्र शेतक-यांनी २६ जानेवारी रोजी वेळागर येथील खाजण खाडीपात्रातील महिलांनी पाण्यात आपल्या कुटुंबासमवेत उभे राहून आंदोलन छेडले. तर  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३५ ते ४० कुटुंबातील पुरुष सदस्यांनी आंदोलन छेडले. एकाच वेळी दोन ठिकाणी आगळे वेगळे लाक्षणिक उपोषण छेडले.

      गेली तीस वर्ष वेळागरवासिय आपल्या न्यायहक्कासाठी लढा लढत आहेत. त्यांची घरे व शेती बाग बागायती यातूनच ३० ते ३५ कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र आज त्यांच्या सातबारामध्ये एमटीडीसी अशी शासनाची नोंद झाली आहे. ती नोंद रद्द करून पूर्ववत शेतकरीबागायतदार भूमिपुत्रांच्या नावाची नोंद करून द्यावी व शेतक-यांना भूमीहिन होण्यापासून वाचवावे या मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी रोजी एक दिवसीय लाक्षधिक उपोषण व आंदोलन छेडले. विशेष म्हणजे या आंदोलनात लहान मुलांनी सहभाग दर्शविला. यावेळी उपस्थित उर्मिला आंदुर्लेकरराजश्री आंदुर्लेकरभाग्यश्री गवंडीमहिमा नाईककुमुदिनी गवंडीशितल आरोसकर,  वनिता आरोसकरशारदा आरोसकरसंध्या रेडकररूपाली आरोसकरप्रगती आरोसकरदीपा आमरेरश्मी डिचोलकरशर्वाणी नाईक यांसह अन्य महिला त्याचबरोबर विनोद आरोसकरवामन गवंडीसंजय आंदुर्लेकरमहेश आंदुर्लेकरप्रदीप आरोसकरजगन्नाथ आंदुर्लेकर यासह वेळागरवाडी येथील ३५  ते ४० कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu