निर्भिड पत्रकारितेची जोखीम

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टसने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, २०२३ मध्ये जगात एकूण १२० पत्रकार व्यावसायिक काम करताना मारले गेले होते. तर किमान ५४७ पत्रकार आजही तुरूंगात किवा नजरकैदेत आहेत. सत्ताधा­यांना प्रश्न विचारण्याची हिमंतकेल्यामुळे यातील काही पत्रकार तुरूंगात आहेत. सत्ताधा­यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेले आवडत नाही. दहशतवादी किवा असमाजिक तत्त्वांच्या विरोधात लिहिणे, ही जोखीम असते. युद्धाचे सत्य लोकांसमोर मांडणं तर त्याहून अवघड. सत्य स्थिती सांगणारी वस्तुनिष्ठ पत्रकारिता सोपी नाही. पत्रकारितेचा व्यवसाय जोखमीचा आहे. अशांत क्षेत्रातून किवा युद्धाच्या ठिकाणाहून लोकांपर्यंत बातमी पोचविण्याचे काम करणा­या पत्रकारांचे जीवन असुरक्षित असते. पत्रकारितेशी बांधिलकी असल्यामुळे पत्रकार जोखीम पत्करतात. सध्या इस्त्रायल-हमास आणि रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून जगातल्या अनेक भागात दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. काही देशांत हुकूमशहा सामान्यांवर प्रचंड अत्याचार करत आहेत. अशा राष्ट्रांत सर्वात जास्त पत्रकारांची हत्या होते, किवा त्यांना तुरुंगात टाकण्यात येते. लोकांसमोर वस्तुस्थिती मांडणे हा जणू त्यांचा गुन्हा आहे.

     दरवर्ष रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सआणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टसडिसेंबरच्या शेवटी जगातील पत्रकारांच्या स्थितीची माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध करतात. त्यात कुठल्या देशात किती पत्रकार मारले गेले आणि किती पत्रकार तुरुंगात आहेत, याची माहिती दिली जाते. त्यातून त्या देशात पत्रकार किती स्वतंत्रआहेत आणि ते किती निर्भिडपणेकाम करू शकतात, ते स्पष्ट होते. पत्रकारांवर हल्ले केले किवा त्यांची हत्या केली तरी आपल्याला काही होणार नाही, याची खात्री अनेक देशांत हल्लेखोरांना असते. अशा आरोपींवरचे खटले मागे घेतले जातात, ही वस्तुस्थिती आहे. पत्रकार कुठल्याही भीतीशिवाय काम करू शकतील, असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची असते. पण त्या दृष्टीने पाऊल उचलताना बहुतेक राष्ट्रे दिसत नाहीत.

    रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात महानगरी टाइम्सवर्तमानपत्रासाठी शशिकांत वारिसे काम करत होते. पंढरीनाथ आंबेरकर नावाच्या रिफायनरी समर्थकाने सात फेब्रुवारीला मोटारीने वारिसेच्या दुचाकीला धडक दिली होती आणि त्यात वारिसेचा मृत्यू झाला. रिफायनरीविरोधात दिलेल्या बातम्यांमुळे वारिसेची हत्या झाली असा आरोप आहे. या हत्येच्या विरोधात राज्यातील पत्रकारांनी निदर्शने केली. गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्रात पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा आहे, पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. पत्रकारांच्या बातम्यांमुळे हितसंबंध दुखावलेले लोक अनेकदा हल्ले करताना दिसतात.तटस्थ आणि निर्भिडपणे लिहिणारे पत्रकार कोणालाही आवडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तडजोड न करता पत्रकारितेच्या मूल्यांवर चालणा­या पत्रकारांमुळे जगात नेमके काय चालले आहे, त्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांना मिळते. ज्या देशात ख-­या अर्थाने लोकशाही आहे आणि जिथे लोकशाही मूल्य राबविले जातात, ज्या देशात विरोधी मतांचा आदर केला जातो त्या देशात पत्रकारांना मारहाण करण्याचे किवा त्यांची हत्या करण्याचे प्रकार सहसा होत नाहीत. हिमतीने लिहिणा­या पत्रकारांमुळे पत्रकारिता जिवंत आहे. आपल्याकडे पत्रकार संरक्षण कायदा जो कागदावर अस्तित्वात आहे तो अधिक सक्षम व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु अस्तित्वात असणारा पत्रकार संरक्षण कायदा आणि प्रत्यक्षातली अंमलबजावणी यातील अंतर जेवढे जास्त तेवढी जोखीम जास्तच राहणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Close Menu