साद फाऊंडेशन पत्रलेखन व काव्यस्पर्धा बक्षिस वितरण संपन्न

  14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त एल. एम. नाईक स्मृतिप्रित्यर्थ साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत येथील शैलेजा पांढरे (आजगाव)- प्रथम, श्रेयश शिंदे (कणकवली) आणि राजू पठाण (अमरावती)- द्वितीय, तर शर्वरी जाधव (कणकवली), आनंद जाधव (कणकवली) आणि संजय तांबे (फोंडा) यांना तृतीय क्रमांक मिळाला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन राधिका तांबोळकर (कणकवली), नेहा पालव (तळेरे) आणि अंजली मुतालिक (कुडाळ) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

      यावेळी साद फाउंडेशनच्या संस्थापिका लतिका नाईक, अध्यक्षा तसेच कुडाळ प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, सचिव सचिन कोर्लेकर, सदस्य प्रा. अपूर्वा तळेकर व वर्षा तळेकर तसेच पंचायत समिती कणकवलीचे शिक्षण विभाग लिपिक आनंद जाधव, कणकवली पंचायत समितीच्या माजी सहा. प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, प्रवीण कोरगावकर, सतीश जाधव, विनायक पाटील आणि स्पर्धक कवी, लेखक उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. अपूर्वा गोलतकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Close Menu