वेंगुर्ल्यासाठी ४ कोटी १९ लाख निधी मंजूर

सिंधुदूर्गाचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील तब्बल ३० कामांना नगरोत्थानमधून ४ कोटी १९ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. या कामांना जिल्हा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसन्ना देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, बाबली वायंगणकर, प्रशांत आपटे, साईप्रसाद नाईक, रवी शिरसाट, बाळू प्रभू, प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते. मंजूर झालेल्या कामांमध्ये दाडाचे टेंब स्मशानभूमीत शौचालय बाथरूम व इतर अनुषंगिक कामे, वडखोल येथील सद्गुरु परब यांच्या घराजवळील संरक्षक कठड्याचे बांधकाम, विठ्ठल मंदिर ते विठ्ठलवाडीत जाणा­या गटाराचे बांधकाम, रामेश्वर गल्ली येथील रस्त्याचे गटारावरील फुटलेल्या फाड्या बसविणे, निशाण तलावाखालील विहिरीजवळील बंधा­-याचे बांधकाम, खांबड भटवाडी रस्ता डांबरीकरण करणे भाग २, जयेश गावडे घर ते गाडेकर घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण, पशुवैद्यकीय दवाखाना ते वेंगुर्ला हायस्कूल गडग्यापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण, मनीषा कोल्ड्रिंक ते झांट्ये यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण, रामघाट रोड येथील साळगावकर घराशेजारील सीडी बर्कचे बांधकाम, वडखोल येथील कृष्ण सावंत घराशेजारील संरक्षक कठड्याचे बांधकाम करणे भाग २, शैलेश नाईक यांचे घर ते डॉ.प्रदिप जोशी यांच्या घरापर्यंत जाणा­-या गटाराचे बांधकाम, भटवाडी येथील घोडगे येथील बंधा­-याची दुरुस्ती, कवी मंगेश पाडगावकर बालोद्यान ते असलम शेख यांच्या घरापर्यंत जाणा­या गटाराचे बांधकाम, झुलता फुल ते सागर सरितापर्यंत जाणा­या गटाराचे बांधकाम, मारुती मंदिर ते गावडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण, दाभोली नाका येथे गटारावर आवश्यक ठिकाणी फाड्या बसविणे व इतर भाग सुशोभीकरण करणे, पाटणकर यांचे घर ते शेखर माडकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता क्राँक्रिटीकरण, म्हाडा वसाहतीमधील कोयंडे ते रवी वेंगुर्लेकर यांच्या घरानजिकच्या गटारावर फाड्या बसविणे, शाहू शेख ते बगश शेख यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता काँक्रीटीकरण, डाँटस कॉलनीजवळील रस्ता डांबरीकरण, बॅ.नाथ पै कम्युनिटी सेंटरसमोरील गटाराचे बांधकाम, चैतन्य म्हापणकर ते प्रदीप प्रभू यांच्या घरानजिकच्या गटाराचे बांधकाम, वरसकर स्टॉप ते मातृछाया पर्यंत गटाराचे बांधकाम, धावडेश्वर स्मशानभूमीत पाय­यांचे बांधकाम, भाजी मार्केटमध्ये पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी कॅनोपीचे बांधकाम, धावडेश्वर मंदिर ते बाबली वायंगणकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण, पाडगावकर बालोद्यान ते जगताप यांच्या घरापर्यंत आणि गाडीअड्डा तिठा ते तांबळेश्वर मंदिरापर्यंत जाणा­या रस्त्याचे डांबरीकरण आदी कामांचा समावेश आहे.

Leave a Reply

Close Menu