सिधुरत्न योजनेचा महिलांनी फायदा घ्या

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियान अंतर्गत वैयक्तिक स्वयंरोजगार व बचत गट यांना कर्ज देण्यात आले होते. अशांना उद्योग-व्यवसाय यांची माहिती व्हावी या उद्देशाने उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन मुख्याधिकारी कंकाळ यांच्या हस्ते झाले. तज्ज्ञ मार्गदर्शक हनुमंत गवस, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे निवृत्त उपसंचालक सुनिल देसाई, बँक ऑफ महाराष्ट्राचे वेंगुर्ला शाखा व्यवस्थापक राजेंद्र वेळकर, सहाय्यक प्रकल्प अधिकाराी विलास ठुंबरे, ‘हिरकणीशहर स्तर संघाच्या उपाध्यक्ष वैभवी पालव यांच्यासह सदस्य, समुदाय संघटक, व्यवस्थापक, लाभार्थी व बचत गट सदस्य उपस्थित होते. इतर यजनांसोबतच ७५ टक्के अनुदान देणा­या सिधुरत्न योजनेचा महिलांनी फायदा घेऊन स्वतःसोबतच इतरांनाही रोजगार द्यावेत. मसाले, पिठ, लोणची या उत्पादन व्यतिरिक्त काजू प्रक्रिया, काथ्या व्यवसाय अशा इतर व्यवसायांचाही विचार करावा. त्यासाठी न.प.देच्या माध्यमातून सहकार्य राहिल असे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिले. तसेच मालाची विक्री व बाजारपेठ मिळून देण्यासाठी सोनचैरियाशहर उपजिविका केंद्र सुरू केले असून महिलांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. हनुमंत गवस यांनी उद्योग म्हणजे काय, उद्योजकता जागृत करणे, ध्येय निश्चित करून ध्येयपूर्ती करणे, जागा निश्चिती, ग्राहक वर्ग ओळखणे, स्वगुंतवणूक, वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. सुनिल देसाई यांनी महिलांचे उद्योजकता व्यक्तीमत्व गुण, विविध वित्तीय योजना, मार्केट सर्व्हे, उद्योगाचे टप्पे याविषयी तर राजेंद्र वेळकर यांनी बँकेमध्ये कर्ज प्रस्तावासाठी लागणा­या प्रकल्प अहवाला बाबत मार्गदर्शन केले. स्वाती बेस्ता, शिवानी ताम्हणेकर, वैष्णवी सावंत, गिता बिडये, पेरपेतीन डिसोजा यांनी या प्रशिक्षणाचा व्यवसाय वाढीसाठी फायदा होणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Close Menu