‘परब‘ पतपेढीची तिसरी शाखा वेंगुर्ल्यात सुरू!

कोकणात परब पतपेढीची तिसरी शाखा वेंगुर्ला येथे नुकतीच सुरू झाली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ मुंबईत कार्यरत असलेल्या या पतपेढीने आपली विश्वासार्हता कायम ठेवत ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर कायम चांगला मोबदला दिला आहे. भांडूप येथे मुख्य शाखा असलेल्या या पतपेढीकडे कोकणातील लोकांचा कायम ओढा राहिला आहे. हे सारे लक्षात घेता संचालक मंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे शाखा सुरू करून कोकणात पाय रोवले. या शाखेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता आधी कुडाळला आणि आता वेंगुर्ल्यात शाखा सुरू केली आहे. वेंगुर्ल्यात मीना पार्क, राऊळवाडा येथे सुरू झालेल्या शाखेचे उद्घाटन श्री देवी सातेरी देवस्थान न्यासाचे अध्यक्ष सुनील परब यांच्या हस्ते झाले. यावेळी परब पतपेढीचे अध्यक्ष अशोक परब, समन्वयक विनायक परब, उद्योजक प्रभाकर परब आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

      गेल्या ४३ वर्षांत परब पतपेढीने सर्वसामान्य लोकांच्या मनात आपली बँक म्हणून विश्वास निर्माण केला आहे. पतपेढीने अडीअडचणीच्या काळात या लोकांना कायम मदत केली असून यामुळेच आज १४ कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा आहेत. कोकणात उतरताना महिलांना केंद्रस्थानी ठेवून पतपेढी प्रगती करत असून महिला बचत गटांना विविध उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करत आहे. याशिवाय विशेष ठेव योजना आणि आकर्षक ठेव योजना या माध्यमातून ग्राहकांना आपल्या ठेवींचा चांगला परतावा मिळत आहे, अशी माहिती पतपेढीचे अध्यक्ष अशोक परब यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu