‘चडू’ या लघु पटाला 5 पुरस्कार

       स्नेहा राणे/बेहेरे लिखीत, दिग्दर्शित ‘चडू’ या  लघु पटाला ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या ‘लेंस फेम“ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 5 पुरस्कार मिळाले आहेत. याआधीही सिंधुदुर्गातील ‘लघुपट‘ महोत्सवात त्यांच्या “चडू“ या शॉर्टफिल्मला प्रथम पारितोषिक तसेच मुंबईतील कलासमृध्दीच्या लघुपट महोत्सवात गोल्ड मेडल मिळाले…

0 Comments

        दिव्या तांबेचे यश

कणकवली तालुक्यातील सांगवे गावची सुकन्या व मुंबई कांदिवली येथील कु. दिव्या प्रकाश तांबे हिने नुकत्याच झालेल्या एम.बी.बी.एस. परीक्षेत लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुयश संपादन केलं. डॉ. दिव्याच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.  

0 Comments

दाभोलीचा सुपुत्र वसंत दाभोलकर यू.पी.एस.सी. परीक्षेत देशात 76 वा

वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचा सुपुत्र वसंत प्रसाद दाभोलकर याने यू.पी.एस.सी.परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले असून संपूर्ण देशातून चक्क 76वी रँक पटकावत अखित भारतीय स्तरावर सिंधुदुर्गात टॅलेंटचा झेंडा रोवला आहे. वसंत दाभोलकर याचे प्राथमिक शिक्षण दाभोली शाळा नं.1 मध्ये झाले. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूलमधून त्याने माध्यमिक…

0 Comments

राहूल वेंगुर्लेकर

पोलिस सेवेत कार्यरत असताना प्रामाणिक आणि उत्तम पद्धतीने दीर्घकाळ सेवा बजावल्याबद्दल सिधुदुर्ग पोलिस दलातील एकूण १२ जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले होते. हे पदक १ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यामध्ये वेंगुर्ल्याचे सुपुत्र राहूल वेंगुर्लेकर (हवालदार, बी.डी.डी.एस.) यांचा समावेश…

0 Comments

लक्ष्मी करंगळे

आयबीपीएस परीक्षेत वेंगुर्ला कॅम्प येथील लक्ष्मी करंगळे हिने यश मिळवत अॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर हा क्लास वन ऑफिसर बनण्याचा मान मिळविला आहे. तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण बॅ.खर्डेकर महाविद्यालयात झाले. तर बीएससी अॅग्रिकल्चर दापोली येथे तिने पूर्ण केला. यावर्षी घेतलेल्या आयबीपीएस परीक्षेमध्ये तिन्ही टप्पे पूर्ण…

0 Comments

अॅड.केयूर काकतकर यांचा सत्कार

कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचा सन २०१६ सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी अॅड.केयूर दिनेश काकतकर जेएमएफसी २०२१ परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात २६व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन न्यायधिशपदासाठी पात्र ठरल्याबद्दल अॅड.काकतकर यांचा कुडाळ लॉ कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अॅड.संग्राम देसाई,…

0 Comments

गणपत मसगे यांना आदिवासी गिरीजन कलाकार पुरस्कार

  महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दिला जाणारा आदिवासी गिरीजन कलाकार पुरस्कार सिंधुदुर्गचे सुपुत्र व राष्ट्रपती पुरस्कार विजेते पिंगुळी-गुढीपूर येथील लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ठाकर आदिवासी समाजाची चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या…

0 Comments

सानवी सातार्डेकर वेंगुर्ला तालुक्यात प्रथम

एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी सानवी मनिष सातार्डेकर हिने ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परिक्षेत इंग्रजी माध्यमातून सुवर्णपदक प्राप्त करुन वेंगुर्ला तालुक्यात प्रथम तर ऑल इंडियामध्ये ८२ वा क्रमांक पटकाविला आहे.  तसेच याचा शाळेतील पल्लव संजय मेस्त्री याने कास्य पदक प्राप्त केले आहे.…

0 Comments

विविध मैदानी स्पर्धेत आर्या पाटील हिचे यश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी आर्या संदिप पाटील हिने विविध मैदानी स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.       कु. आया…

0 Comments

प्रा. डॉ. अभिजीत महाले

वेंगुर्ले येथील प्रा. डॉ. अभिजीत महाले यांना अलिकडेच मुंबई विद्यापीठाने अकैौंटन्सी विषयांतील संशोधन कार्यासाठी पीएचडी गाईड म्हणून मान्यता दिली आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पीएचडी संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत प्रा. महाले मार्गदर्शक म्हणून काम पाहतील. या केंद्राचा…

0 Comments
Close Menu