वेंगुर्ला शाळा नं.1 मध्ये महिला दिन उत्साहात

शासनाच्या परिपत्रकानुसार महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाळा नं.1च्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 8 मार्च रोजी सायंकाळी शाळेच्या 'विठाई' सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हापरिषद आरोग्य विभागाच्या अधिकारी समृद्धी परब आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्या हस्ते झाले.  …

0 Comments

पं. स.सभापतीपदी शंकर घारे तर उपसभापतीपदी सचिन देसाई

वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक 9 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. तत्पूर्वी वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयात झालेल्या महायुतीच्या सभेत भाजपा तालुकाध्यक्ष पपू परब यांनी सभापती पदासाठी मातोंड पंचायत समिती सदस्य शंकर घारे यांचे तर शिंदेसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालवलकर…

0 Comments

मैत्रीच्या पर्यटनाची ‘शंभरी’!

     माणूस निवृत्त झाला की चार भिंतींत अडकतो, हा समज मोडीत काढत भारतीय नौदलातील काही निवृत्त सहकाऱ्यांनी मैत्रीचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यातून १९८२ साली सुरू झालेला या समूहाचा पर्यटनाचा प्रवास आज १०० व्या सहलीच्या ऐतिहासिक टप्प्यावर…

0 Comments

टांककर-शेटये ट्रस्ट रूग्णवाहिकेचे लोकार्पण

टांककर-शेटये ट्रस्टच्या सौजन्याने शिरोडा, आरवली, रेडी परिसरातील रूग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरवली येथील पणशीकर मंगल कार्यालय येथे सिंधुदुर्गच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, टांककर-शेटये ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन शेटये, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, बाबल गावडे, जि.प.सदस्य…

0 Comments

कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केलेल्या आणि  मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवपूजा करून…

0 Comments

मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर

वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचची बैठक मराठी भाषा दिनादिवशी संपन्न झाली. या बैठकीत 2026-27 या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर तर कार्याध्यक्षपदी नूतन परब यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-साक्षी परब, खजिनदार-रूपा शिरसाट, सचिव-दिव्या आजगांवकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख-स्वाती…

0 Comments

शिवप्रेमी मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात

माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभ आयोजित केले होते. वेशभूषा स्पर्धेत आद्या खापरे, अंतरा आडेलकर आणि भूरे यांनी अनुक्रमे प्रथम तीन तर आयुष बागायतकर व सोनाक्षी बागायतकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. दोन गटात…

0 Comments

व्यवसायाभिमूख ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज-डॉ.मोरे

           बॅ.खर्डेकर महाविद्यालयामध्ये 'राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020' यावर 26 फेब्रुवारी रोजी एक दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद पार पडला. याचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई व अंजली देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर कोल्हापूरचे माजी नगरसेवक अजितराव मोरे,…

0 Comments

रंगरंगोटीने अंगणवाडीच्या निर्जीव भिंती झाल्या बोलक्या

वेंगुर्ला शहरातील शाळा नं.4च्या अंगणवाडीची वर्गखोली रंगरंगोटी करून आकर्षक करण्याची गरज होती. यासाठी हॉटेल कृष्णाचे मालक आनंद रेडकर व नगरसेवक समिधा रेडकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने अंगणवाडीच्या वर्गखोलीची रंगरंगोटी करून दिली. नुसती रंगरंगोटीच नाहीतर छोट्या मुलांच्या शिक्षणानुसार भिंतीवर बाराखडी, आहाराबाबत घ्यावयाची काळजी, मुलांनी…

0 Comments

वेंगुर्ला न.प.चा 15.64 कोटीचा शिलकी अर्थसंकल्प

        वेंगुर्ला न.प.सन 2026-27च्या 15 कोटी 64 लाख 81 हजार 984 रूपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला झालेल्या खास बैठकीत मान्यता देण्यात आली. न.प.च्या शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी 112 कोटी 13 लाख 24…

0 Comments