►सिंधुतार्ईंच्या आठवणींना उजाळा

दादर मुंबई मराठी संदर्भ ग्रंथालयात सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देणारे साहित्य प्रदर्शन भरवून सिंधुतार्ईंना आदरांजली वाहिली. त्यात ‘साप्ताहिक किरात दिवाळी अंक 2012’ मध्ये प्रसिद्ध झालेला सिंधुताईवरील लेख दर्शनी भागात प्रदर्शनात लावला होता. किरातचे मुंबईतील वाचक श्रीकांत जाधव यांनी सदर छायाचित्र पाठविले आहे.

0 Comments

►नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह व शॉपिगचे १९ रोजी उद्घाटन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील ‘नाटककार मधुसूदन कालेलकर बहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉलचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी भव्य दिव्य कार्यक्रम करून होणार आहे. दरम्यान, १९, २०, २१ डिसेंबर असा तीन दिवसीय ‘आरंभ उत्सव‘ साजरा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.       नगराध्यक्ष दालनात बोलताना श्री. गिरप म्हणाले…

0 Comments

► उपनगराध्यक्ष पदासाठी ५ रोजी पोटनिवडणूक

      मच्छिमार्केटचे बांधकाम करताना प्रस्थापित झालेल्या ‘त्या‘ १५ गाळेधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत तत्कालीन उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी २६ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजिनामा दिला होतो. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी तो मंजूरही केला होता. दरम्यान, या रिक्त उपाध्यक्ष पदासाठी ५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील महसूलचे…

0 Comments

►उत्साही वातावरणात घरोघरी गणपतीचे पूजन

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात घरोघरी आज उत्साहपूर्ण वातावरणात गणपतीचे पूजन करण्यात आले. गणपती शाळेतून गेले दोन दिवस गणपती घरी नेतानाचे चित्र आजही सकाळही पहायला मिळाले.       भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले. गतवर्षी कोरोनाच्या…

0 Comments

►इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १० ते १९ सप्टेंबर २०२१ कालावधीत शहर मर्यादित ‘इको फ्रेंडली गणेश उत्सव‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.        गणेश मूर्ती ही संपूर्ण मातीची इको फ्रेंडली असावी, सजावटीमध्ये थर्मकॉल, पीओपी, प्लास्टिक साहित्यांचा वापरा न करता फक्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा, पर्यावरण संवर्धन, …

0 Comments

►वेंगुर्ल्यात नारायण राणेंचा उद्या नागरी सत्कार

केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणे हे २९ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच वेंगुर्ला येथे येणार आहेत. यानिमित्त त्यांच्या जल्लोषी स्वागताबरोबरच विविध संस्थांच्यावतीने नागरी सत्कारही होणार आहे.       रविवारी संध्याकाळी ६ वाजता शिरोडा नाका येथे रेडी जिल्हा परिषद गटातर्फे सत्कार, तर ६.३० वाजता मांडवी गार्डन येथे…

0 Comments

►वेंगुर्ला आगारातून ग्रामीण भागात बसेस सुरु

वेंगुर्ला आगारातर्फे २३ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील बसेस सुरु केल्या आहेत. यामध्ये वेंगुर्ला-किरणपाणी स.११.३० तर किरणपाणी-वेंगुर्ला दु. १२.४५, वेंगुर्ला-रेडी दुपारी २.४५, रेडी-वेंगुर्ला दुपारी ४.१५, वेंगुर्ला-किरणपाणी (वस्ती) सायं.७वा., किरणपाणी-वेंगुर्ला स.७वा., वेंगुर्ला-वायंगणी स.८.४०वा., वेंगुर्ला-रेडी स. ९.४५ तर रेडी-वेंगुर्ला स. ११वा., वेंगुर्ला-वायंगणी दु.१२.१०, वायंगणी-वेंगुर्ला-१२.४०, वेंगुर्ला-पाल-बांबरमार्गे सावंतवाडी स.१०.३०वा.…

0 Comments

►वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात

दरवर्षी वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. गतवर्षी कोरोनामुळे हा सण अगदी मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला होतो. यावर्षी अनलॉकमुळे हा सण साजरा करता आला. यावेळी वेंगुर्ला पोलिस स्टेशन, तालुका पत्रकार समिती आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे नारळ अर्पण करण्यात आला.…

0 Comments

►वेंगुर्ला मच्छिमार्केटचे 11 रोजी लोकार्पण

वेंगुर्ला शहरातील बहुचर्चित अशा सुसज्ज मच्छिमार्केट इमारतीचे 11 जुलै ला केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आहे. जिल्ह्रातील सर्व मच्छिमार्केटचा अभ्यास करुन त्यात…

0 Comments

►वेंगुर्ला शहरात भरवस्तीत दोन बिबट्याचा मुक्त संचार

वेंगुर्ला-बेळगाव महामार्गावर हम रस्त्यानजिकच्या भागात कुबलवाडा, महाजनवाडी व वेंगुर्ला शहर भागात दोन बिबट्याचा मुक्त संचार आज दुस-या दिवशी सुरुच आहे. या बिबट्याने भटक्या कुत्र्याचा फडशा पाडला असला तरी भरवस्तीतच बिबट्या वावरत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.       काल ५ जून…

0 Comments
Close Menu