अ.भा.संघाच्या २५ शिक्षकांचा प्राथमिक शिक्षक समितीमध्ये प्रवेश

वेंगुर्ला तालुक्यातील अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या २५ आघाडीच्या पदाधिकारी शिक्षकांनी एकनाथ जानकर यांच्या नेतृत्वाखालील प्राथमिक शिक्षक समितीमध्ये जाहिर प्रवेश केला. यामध्ये एकनाथ जानकर, सरोज जानकर, कर्पूरगौर जाधव, रामचंद्र झोरे, रवि गोसावी, विजय मस्के, सागर लाखे, विलास गोसावी, वैदेही गोसावी, जयंत जोशी, पंचफुला मोरे, समिर तेंडोलकर, गुंडू शेळके, पांडुरंग चिदरकर, अनिशा झोरे, अमोल आग्रे, वृषाली मोहिते, संजिवनी ढांस, राजाराम लोटे, दिपमाला जाधव, विश्वनाथ जगताप, सुजाता शिवगण, संतोष गोसावी आदींचा समावेश आहे.

      साई मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण, माजी राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, सचिव प्रसाद जाधव, शिक्षक नेते संतोष परब, आनंद पेडणेकर, विजय सावंत, त्रिंबक आजगावकर, सिताराम नाईक व राजू वजराटकर यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. दोन वेळा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूकीत मताधिक्य मिळवत संघटनेची ताकद निर्माण केली. परंतु काही ज्येष्ठ नेत्यांनी कायमच अवहेलना करत अन्याय केला. याला वाचा फोडण्यासाठी माझ्या सहका­-यांनी शिक्षक समितीत प्रवेश केला असल्याचे एकनाथ जानकर यांनी सांगितले.

      प्राथमिक शिक्षक समिती ही चळवळ अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेली ६९ वर्षे कार्यरत असून फोडाफोडीचे राजकारण कधीही शिक्षक समिती करत नाही. या संघटनेच्या कार्यावर प्रभावित होऊन प्रवेश करणा­या शिक्षक कार्यकर्त्यांचा शिक्षक समिती नेहमीच योग्य सन्मान करते असे गौरवोद्गार जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी काढले.

Leave a Reply